उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका
पुण्यातील राज्यव्यापी अधिवेशनात भाजपाचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जोरदार भाषण झाले. त्यांनी उद्धव ठाकरे यांनी औरंगजेब फॅन क्लबच्या नेते असल्याची टिका अमित शाह यांनी केली आहे.
पुण्यात भाजपाचे राज्य अधिवेशन सुरु आहे. अमित शाह यांनी भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे. यावेळी अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टिका केली आहे. यावेळी त्यांनी उपस्थित भाजपाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सवाल केला की औरंगजेब फॅन क्लब कोण आहे? तर उपस्थितांनी एकमुखाने आघाडीवाले असे उत्तर दिले, त्यावेळी अमित शाह म्हणाले की ते ठिक आहे पण महाविकास आघाडीचे नेते कोण आहेत ? उद्धव ठाकरे आहेत ना… उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत. स्वत:ला बाळासाहेबाचे ठाकरे यांचे वारसदार म्हणविणारे उद्धव ठाकरे कसाबला बिर्याणी खिलविणाऱ्यांसोबत बसले आहेत, याकुबला सोडण्याची मागणी करणाऱ्यांच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. झाकीर नाईकला मॅसेंजर ऑफ पिस म्हणणाऱ्यांच्या मांडीवर तुम्ही बसला आहात, पीएफआयला पाठींबा देणाऱ्यांच्या मांडीवर तुम्ही जाऊन बसला आहात. संभाजीनगराला विरोध करणाऱ्यांच्या मांडीवर तुम्ही बसला आहात तुम्हाला लाज वाटायला पाहीजे अशी जहरी टीका अमित शाह यांनी यावेळी केली आहे.