Special Report | आता संघर्ष रस्त्यावर होणार? शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राज्याचा दौरा करणार?
धर्मगुरु बाबूसिंह महाराज यांनीही उद्धव ठाकरेंना पोहरादेवीला येण्याचं निमंत्रण दिलंय. एकनाथ शिंदेंच्या जवळचे मानले जाणारे शहाजीबापू पाटील यांच्याही मतदारसंघात शिवसेना मेळावा घेणार आहेत. 21 ऑगस्ट रोजी शिवसेना खासदार अरविंद सावंत सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावऱ आहेत. त्याच दरम्यान सांगोल्यात शिवसेनेचा महामेळावा होणार आहे.
मुंबई : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray ) पहिल्यांदाच राज्याचा दौरा करण्याची शक्यता आहे. बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवीतून उद्धव ठाकरेंचा दौरा सुरु होण्याची शक्यता आहे. धर्मगुरु बाबूसिंह महाराज यांनीही उद्धव ठाकरेंना पोहरादेवीला येण्याचं निमंत्रण दिलंय. एकनाथ शिंदेंच्या जवळचे मानले जाणारे शहाजीबापू पाटील यांच्याही मतदारसंघात शिवसेना मेळावा घेणार आहेत. 21 ऑगस्ट रोजी शिवसेना खासदार अरविंद सावंत सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावऱ आहेत. त्याच दरम्यान सांगोल्यात शिवसेनेचा महामेळावा होणार आहे. आदित्य ठाकरेंनीही आपला शिवसंवाद मेळावा पुन्हा सुरु केलाय. आदित्य ठाकरे सध्या महाडच्या दौऱ्यावर आहेत. शिंदे गटात असलेले आमदार भरत गोगावलेंच्या मतदारसंघात ते सभा घेतायत. शिवसेनेची तोफ आणि शिंदे गटाला अंगावर घेणारे संजय राऊत सध्या तुरुंगात आहेत. सध्या आदित्य ठाकरे एकाकी किल्ला लढवतायत. त्यांना साथ देण्यासाठी आता पक्षातले मोठे नेतेही मैदानात उतरण्याची शक्यता आहे.