Special Report | छत्रपती संभाजीनगरमध्ये वातावरण शांत, आता मैदान अन् ‘मविआ’चे नेते सज्ज
VIDEO | छत्रपती संभाजीनगरचं मैदान सज्ज, मविआचे नेतेही तयार.. उद्या उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार, बघा टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गडात झालेल्या राड्यानंतर वातावरण शांत झाले आहे. यानंतर आता सर्वांचे लक्ष उद्या होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेकडे लागले आहे. उद्धव ठाकरे यांच्यसह अजित पवार आणि नाना पटोले उद्या महाविकास आघाडीच्या एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. मात्र आता उद्या होणाऱ्या सभेत उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर कोण येणार याची चर्चा रंगण्यास सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगरचं मैदान सज्ज झाले असून मविआचे नेतेही तयार झाले आहे. तर या सभेसाठी मविआचे कार्यकर्ते दाखल होण्यासही सुरूवात झाली आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर महाविकास आघाडीची पहिली सभा असणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गडात झालेल्या राड्यानंतर महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेचं काय होतं? यावरून प्रश्नचिन्ह निर्माण झालं होते मात्र छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी १५ अटी शर्थींसह या सभेला परवानगी दिली आहे. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट