छत्रपती संभाजीनगर झालं भगवंमय, ‘मविआ’ची राज्यात होणार पहिली एकत्रित सभा
VIDEO | छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा, सभेच्या निमित्तानं चौका-चौकाचं सुशोभिकरण
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या २ एप्रिल रोजी महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे. ही सभा होत नाहीतर त्यापूर्वीच विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी याच्याआधी मविआची सभा ही सगळी कॉमेडी सभा असेल अशी टीका केली असताना आता संभाजीनंगरचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते संदीपान भुमरे यांनी देखील उद्धव ठाकरे अन् मविआच्या सभेवर निशाणा साधला आहे. अशा परिस्थितही उद्या सायंकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची राज्यातील पहिली एकत्रित सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सभेच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहर भगवेमय करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील महत्त्वाचे चौक भगव्या वस्त्राने सुशोभित करण्यात आले असून या माध्यमातून उद्याची वज्रमूठ सभा भव्य करण्यासाठी आपण तयार असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून केला जात आहे.