भाजपने टिळक घराण्याचा वापर करून फेकून दिलं; उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्लाबोल

भाजपने टिळक घराण्याचा वापर करून फेकून दिलं; उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्लाबोल

| Updated on: Feb 23, 2023 | 10:31 PM

VIDEO | पोटनिवडणूक प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन जनतेला संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका

मुंबई : पुण्यात कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा प्रचार सुरु आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोटनिवडणुकीचा प्रचार करत जनतेशी संवाद साधला. या ऑनलाईन प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.कसबापेठ आणि पिंपरीमध्ये मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक लागली असून भाजप खासदार गिरीश बापट यांना आजारी असतानाही प्रचारासाठी आणल्याच्या मुद्द्यावरुन सडकून टीका केली. भाजपने मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपने टिळक कुटुबीयांना वापरून फेकून दिल्याची घणाघाती टीका केली. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी मतदारांना ऑनलाईन पद्धतीने संबोधित केले. यावेळी भाजपला कोणतीही सहानुभूती दाखवण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले.भाजपची पाशवी पकड दूर फेकण्याची सुरूवात या पोटनिवडणुकीपासून करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Published on: Feb 23, 2023 10:31 PM