विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 11 मार्च पूर्वी घ्यावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांना पत्र लिहिण्याची शक्यता
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 11 मार्चपूर्वी घेण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्राद्वारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करणार असल्याची माहिती आहे.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 11 मार्चपूर्वी घेण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्राद्वारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद रिकामं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी, असं पत्र राज्य सरकारला लिहिलं होतं. त्यावेळी राज्य सरकारनं निवडणूक घेतली नव्हती. गेल्या अधिवेशनात विधासनभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपालांकडे परवागनी मागण्यात आली होती. मात्र, त्यावेळी राज्यपालांच्या परवागनी अभावी निवडणूक लांबणीवर पडली होती. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विधानसभा अध्यक्षपद निवडणूक घेण्यास परवागनी देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
Latest Videos