Video : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्य न्यायमूर्तींच्या भेटीसाठी उच्च न्यायालयात दाखल
राज्यातील राजकारण सध्या हिंदुत्व, मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसाच्या (Hanuman Chalisa) मुद्द्यावरुन चांगलंच गाजलं आहे. दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलाच दणका दिलाय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या भेटीसाठी उच्च न्यायालयात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री यावेळी मुख्य न्यायमूर्तींसाठी अन्य न्यायमूर्तींचीही भेट घेणार असल्याची […]
राज्यातील राजकारण सध्या हिंदुत्व, मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसाच्या (Hanuman Chalisa) मुद्द्यावरुन चांगलंच गाजलं आहे. दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलाच दणका दिलाय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या भेटीसाठी उच्च न्यायालयात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री यावेळी मुख्य न्यायमूर्तींसाठी अन्य न्यायमूर्तींचीही भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, या भेटीमागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र राज्यातील सध्यस्थिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) आणि ओबीसी आरक्षण या पार्श्वभूमीवर ही भेट होत असल्याची चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यापूर्वी मुख्य न्यायमूर्तींची भेट घेतली होती.