स्वातंत्र्यवीर सावरकर आज असते तर…, संजय राऊत यांचा भाजपवर घणाघात
VIDEO | भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सावरकर गौरव यात्रा म्हणजे ढोंग, काय केली संजय राऊत यांनी टीका
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली ते म्हणाले राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला त्यावेळी विधिमंडळाचे अधिवेशन झाले परंतु त्यावेळी विरोधक गप्प होते. मात्र आता तेच लोक सावरकर आपले दैवत असल्याचे बोलत आहे. आता ते राहुल गांधींच्या थोबाडीत मारणार का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील भाजपच्या सावरकर गौरव यात्रावर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, सावरकर गौरव यात्रा हे ढोंग आहे. सावरकरांचे भाजपला काय प्रेम? त्यांच्याबरोबर जे मांडीला मांडी लावून बसले त्यांना सावरकर कळले का हे ढोंग आहे. नौटंकी राजकारणातून सावरकरांचा वापर करायचा ही त्यांची नीती आहे. वीर सावरकर हे वेगळे व्यक्तिमत्व होते, ते जर आज असते तर या ढोंगी लोकांना चांगलं बदडून काढलं असतं. असे ते म्हणाले.