'मणिपूर, हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही दंगली घडवण्याचा कट सुरू, पण...', संजय राऊत यांचे काय गंभीर आरोप?

‘मणिपूर, हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही दंगली घडवण्याचा कट सुरू, पण…’, संजय राऊत यांचे काय गंभीर आरोप?

| Updated on: Aug 06, 2023 | 12:05 PM

VIDEO | 'महाराष्ट्रात दंगली घडाव्या म्हणून देवेंद्र फडणवीस, भाजप आणि त्यांचं गुरुजी मंडळ तणाव निर्माण करतंय', संजय राऊत यांचा हल्लाबोल

मुंबई, ६ ऑगस्ट २०२३ | मणिपूर, हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही दंगली घडवण्याचा कट सुरू आहे. पण महाराष्ट्रात दंगली होणार नाही. राज्यातील जनता सूज्ञ आहे, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. मणिपुरसह काही राज्यात गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरू असून परवा संतप्त जमावाने जवानांचा शस्त्रसाठाच पळवून नेला. त्यामुळे या भागातील वातावरण अधिक तापल्याचे पाहायला मिळाले. या संपूर्ण पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी हा मोठा दावा केला आहे. मणिपूर, राजस्थान, हरियाणा आण दिल्लीच्या सीमेवर दंगली घडवण्यात येत आहे. काही ठिकाणी झाल्या आहेत. महाराष्ट्रात तशा दंगली घडाव्या म्हणून देवेंद्र फडणवीस, भाजप आणि त्यांचं गुरुजी मंडळ तणाव निर्माण करत आहे. या राज्यात दंगलीची आग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण जनता सूज्ञ आहे. अशा कटकारस्थानाला बळी पडणार नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Published on: Aug 06, 2023 12:05 PM