एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं – उद्धव ठाकरे
"एकनाथ शिंदेंसाठी काय नाही केलं? माझ्याकडची दोन खाती मी शिंदेंना दिली. शिंदे बडव्यांबद्दल बोलतात, ज्यांचा मुलगा शिवसेनेकडून खासदार आहे. शिंदेंसाठी मी काय कमी केलं," असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
“एकनाथ शिंदेंसाठी काय नाही केलं? माझ्याकडची दोन खाती मी शिंदेंना दिली. शिंदे बडव्यांबद्दल बोलतात, ज्यांचा मुलगा शिवसेनेकडून खासदार आहे. शिंदेंसाठी मी काय कमी केलं,” असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. “माझं मुख्यमंत्रिपद नाकारणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. हे सारं भाजपने केलं आहे, त्यांची आग्र्याहून सुटका करावीच लागेल. तुम्हाला भविष्य दिसत असेल तर खुशाल जा. बंडखोर आमदारांसाठी मी काय कमी केलं. संजय राठोडांवर अनेक आरोप झाले. विचित्रं आरोप झाले. त्या काळातही मी त्यांना सांभाळून घेतलं, असंही ते म्हणाले. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर तब्बल चौथ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी मौन सोडलं.
Published on: Jun 24, 2022 03:55 PM
Latest Videos