लोकसभेसाठी उद्धव ठाकरे मिशन मोडवर! लोकसभा निवडणुकीसाठी मविआचा फॉर्म्युला काय?
VIDEO | उद्धव ठाकरे यांचा ४८ जागांचा आढावा, तर सुप्रिया सुळे यांना मदत करा, बारामतीसाठी विशेष सूचना दिल्यात आणि संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा सांगितला फॉर्म्युला... बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, १८ ऑगस्ट २०२३ | 8 महिन्यांनी होणाऱ्या लेकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील ४८ जागांचा आढावा घेण्यास सुरूवात केली. तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना मदत करा, असा सूचनाही उद्धव ठाकरे यांनी दिल्यात. तर संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला देखील सांगितलाय. जिंकू शकेल त्याची जागा, असा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला असल्याचे संजय राऊत यांनी सांगितलंय. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. २०१९ मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होती. त्यावेळी भाजपचे २३ तर शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते. मात्र शिवसेना फुटीनंतर ठाकरे गटाचे ०५ आणि शिंदे गटाचे १३ खासदार आलेत. त्यावेळी राष्ट्रवादी ४, काँग्रेस, एमआयएम आणि अपक्ष असे प्रत्येकी एकएक जागा निवडून आल्यात. संजय राऊत यांच्या पाठोपाठ शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील जिंकण्याची क्षमता बघूनच जागा वाटप होईल असे म्हटले आहे. बघा नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे…