“काड्या घालणाऱ्यांनी कांड्यांची भाषा करू नये”, ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
VIDEO | उद्धव ठाकरे आज रत्नागिरीतील बारसूच्या दौऱ्यावर, विरोधकांना उत्तर देताना ठाकरे गटाच्या नेत्याचा विरोधकांना टोला, काय म्हणाले बघा...
मुंबई : उद्धव ठाकरे आज रत्नागिरीतील बारसूच्या दौऱ्यावर आहेत. या बारसूमध्ये विरोधात आणि समर्थनात दोन प्रकारचे आंदोलन होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, आजचा दिवस महत्वाचा आहे. ज्यावेळी कोणताही प्रकल्प येत असला त्यावेळी रोजगार जरी असला तरी ती जागा कोणाची आहे, याला विश्वासात घेतलं पाहिजे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बारसूला आहेत आणि लोकांना समजून घेणार आहेत. तर आदित्य ठाकरे देखील पुण्यात चिपको आंदोलनसाठी जात आहेत. त्यामुळे आजचे हे दोन्ही विषय पर्यावरण विषयी असल्याने आमच्यासाठी महत्वाचे आहेत, असे त्यांनी म्हटलं तर मुंबईतून ठाकरे गटाची माणसं जिलेटीनच्या कांड्या आणि गुंड घेऊन बारसू येथे जाताय, असे म्हणत निलेश राणे आणि नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. यावर बोलताना सचिन आहिर म्हणाले, ‘काड्या घालणाऱ्यांनी कांड्यांची चर्चा करावी हे दुर्दैव आहे. त्यांना याची इतकी माहिती असेल तर ही माहिती पत्रकार परिषदेत देण्यापेक्षा ती NIA ला द्यावी,’,असे म्हणत खोचक टोलाही लगावला आहे.