Sanjay Raut : दोन भाऊ एकमेकांना भेटत असतील तर भेटू द्या; राऊतांचं भावनिक विधान
Sanjay Raut Press Conference : राज ठाकरेंसोबतच्या युतीबद्दल उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक असल्याचं आज पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.
लोक भावनेचा विचार करूनच उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ते कमालीचे सकारात्मक आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे ही लोक भावना आहे आणि ती सर्वांनी समजून घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये कोणताही अहंकार नाही किंवा कटुता देखील नाही. हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो, असं खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना म्हंटलं आहे.
पुढे बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, राज ठाकरे सध्या मुंबईत नाहीत. ते कोणत्या ठिकाणी गेले हे मला माहित नाही. मात्र सध्या ते मुंबईत नाहीत. राज ठाकरे यांनी हात पुढे केला आहे आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला आहे. मात्र सध्या ते मुंबईत नाहीत. ते दोघे परत आल्यानंतर याविषयी चर्चा करू. दोन भाऊ एकमेकांना भेटत असतील तर भेटू द्या. आम्ही देखील त्यांच्यासोबत असणार आहोत. मी तर दोन्ही घरचा पाहुणा आहे, असं देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे किंवा आम्ही बराच कालखंड एकत्र राहिलेलो माणसे आहोत. राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांचे आणि माझे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते संबंध होते. आमचं सर्वांचं भावनिक नातं असल्याचं देखील राऊत यांनी सांगितलं.

आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?

भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान

ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान

Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
