केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्यांसारख्या वागताहेत, न्यायदेवतेला बुडाखाली घेण्याचा प्रयत्न; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्यांप्रमाणे वागत आहे. ज्याच्या अंगावर जा म्हटलं तर जात आहे. हे संपूर्ण जग बघत आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
मुंबईः सध्याच्या केंद्रीय यंत्रणा (Central Agencies) केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्यासारख्या आहेत. ज्याच्या अंगावर जा म्हटलं तिथं धाव घेतात, असा घणाघात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलाय. शिवसेना खासदार संजय राऊत यांची मंगळवारी जामीनावर सुटका झाली. त्यानंतर बुधवारी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी अत्यंत विजयी मुद्रेत संवाद साधला. तसेच कोर्टाने योग्य निर्णय दिल्याबद्दल कोर्टाचे आभार मानले.
संजय राऊतांच्या जामीनावर पहिली प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ आनंदाखेरीज दुसरी प्रतिक्रिया असू शकत नाही. संजयच्या धाडसाचं कौतुक आहे. मुद्दाम आरेतुरे बोलतो. संजय शिवसेनेचा नेता, खासदार, सामनाचा कार्यकारी संपादक आहे. त्याचबरोबरीनं जिवलग मित्र आहे. संकटाच्या काळात न डगमगता लढत असतो. संकटात तो लढतोय. काल कोर्टाने निकाल दिला. न्यायदेवतेचे मी आभार मानतो.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी कोर्टाचे आभार मानले. ते म्हणाले, ‘ काल स्पष्ट झालं. न्यायदेवतेचे आभार,. काही स्पष्ट निरीक्षणं नोंदवली आहे. केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्यांप्रमाणे वागत आहे. ज्याच्या अंगावर जा म्हटलं तर जात आहे. हे संपूर्ण जग बघत आहे. देश बघत आहे. गेल्या काही दिवसातील उदाहरणे आहेत.
न्यायदेवतेवरही शंकेचं वातावरण निर्माण झालंय, अशी टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली. ते म्हणाले, ‘ न्याय देवताही आपपल्या अंकित करण्याची सुरुवात केंद्र करतात की काय अशी केंद्रीय कायदामंत्री रिजिजू यांची विधाने आहेत. सर्व सामान्यांच्या आशेचा किरण न्यायालय असतात. न्यायालय आपल्या बुडाखाली घेण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला विरोध केला पाहिजे..