भारताची चांद्रयान ३ मोहीम यशस्वी, उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, 'संपूर्ण देशासाठी...'

भारताची चांद्रयान ३ मोहीम यशस्वी, उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘संपूर्ण देशासाठी…’

| Updated on: Aug 23, 2023 | 11:58 PM

VIDEO | भारताच्या चंद्रयान ३ मोहीमेच्या यशस्वी लँडिंगनंतर संपूर्ण देशभरात आनंद, ISRO च्या सर्व वैज्ञानिकांचं उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिनंदन, चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्यानतंर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

मुंबई, २३ ऑगस्ट २०२३ |भारताच्या चांद्रयानाचं विक्रम हे लँडर यशस्वीरित्या चंद्रावर लँडिंग झाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. चंद्रावर भारताचे चंद्रयान सुरक्षित रित्या उतरले. जे कोणाला साध्य झाले नाही ते भारताने करून दाखवले. सर्व भारतीयांसाठी हा अत्यानंदाचा आणि अभिमानाचा क्षण. सर्व वैज्ञानिकांचे आणि नागरिकांचे हार्दिक अभिनंदन! असे म्हणत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘हिंदुस्थानाने आज चंद्रावर पाऊल ठेवून इतिहास घडवला. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अथक परिश्रम आणि संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचे हे यश आहे. इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी इतिहास घडवला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके कमीच आहे. संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे’, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Published on: Aug 23, 2023 11:58 PM