शिंदे-फडणवीस यांच्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे यांची एका वाक्यात प्रतिक्रिया, बघा कसं केलं वर्णन

शिंदे-फडणवीस यांच्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे यांची एका वाक्यात प्रतिक्रिया, बघा कसं केलं वर्णन

| Updated on: Mar 09, 2023 | 5:35 PM

VIDEO | गरजेल तो बरसेल काय... शिंदे-फडणवीस यांच्या अर्थसंकल्पावर नेमक काय म्हणाले उद्धव ठाकरे?

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून पहिलाच अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सडकून टीका केली आहे. तर उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी याचं वर्णन गाजर हलवा अर्थसंकल्प आहे, अशा शब्दात वर्णन केलं. अर्थसंकल्पावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज सरकारने केवळ घोषणांचा पाऊस पाडला आहे. सर्व घटकांना मधाचं बोट लावल्याचा प्रयत्न झाला. अवकाळी पाऊस झाला तसा मुंबईत गडगडाटही झाला. गरजेल तो बरसेल काय, असा अर्थसंकल्प आहे. गाजर हलवा अशा प्रकारचा आहे. आमच्या योजनांचं नामांतर करून योजना मांडल्या आहेत. बघा काय केली उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर सडकून टीका…

Published on: Mar 09, 2023 05:35 PM