अबकी बार चंद्रहार! ‘पक्षातले पळपुटे जातायेत, पण मर्द…’, चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी ठाकरेंची छाती फुलली
महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे मनापासून आभार मानले. चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी ठाकरेंची छाती फुलली
सांगली, ११ मार्च २०२४ : महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे मनापासून आभार मानले. उद्धव ठाकरे यांनी आपला केलेला सन्मान हा महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाचा सन्मान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले तर चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशामुले आपली छाती अभिमानाने फुलली असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी अबकी बार चंद्रहार अशा घोषणा उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्यात. ‘मी आपल्या सर्वांचं मातोश्री आणि शिवसेनेत स्वागत करतोय. आज खरंच माझी छाती अभिमानाने फुलून आली आहे. छाती किती इंच झाली ते काही मी सांगू शकत नाही. पण मर्दाची छाती बघितल्यानंतर सांगलीत आपल्याशी लढण्याची कुणाची छाती होणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रात. पक्षातले पळपुटे पळून जात आहेत, पण मर्द सहभागी होत आहेत. कारण शिवसेना ही नेहमी मर्दांची संघटना आहे.’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.