बाळासाहेब ठाकरे याच्यामुळे उद्धव-राज ठाकरे राजकीय समीकरणं जुळणार का? बघा स्पेशल रिपोर्ट
VIDEO | ठाकरे बंधू एकत्र येणार ? बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य स्मारकाच्या निमित्ताने उद्धव-राज ठाकरे दोघं एकत्र आले तर कसं असणार आगामी राजकारण?
मुंबई, ८ ऑगस्ट २०२३ | महाराष्ट्राच्या राजकारणात राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावरून कायम चर्चा सुरू असते. अशातच मुंबईच्या दादरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य स्मारक तयार होतंय. यासाठी गरज पडल्यासं उद्धव ठाकरे यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करण्याची तयारी आहे. मात्र यावरून दोन्ही भावांचं राजकीय समीकरण जुळणार का? अशी चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक मुंबईतील शिवाजी पार्कातील जुन्या महापौर बंगल्यात होतंय. स्मारक समितीवर ठाकरे कुटुंब असून उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचा समावेश आहे. बाळासाहेब यांच्या काही आठवणी असतील तर त्या देण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय. या स्मारकात बाळासाहेबांची जुनी भाषणं, फोटो त्यांच्या दौऱ्यांच्या माहितीचा समावेश असणार आहे. पण १९८५ च्या पूर्वीच्या बाळासाहेबांच्या भाषणांसाठी उद्धव-राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं कळतंय.