Special Report | उद्धव ठाकरे गाफिल राहिले, नितीश कुमार सावध झाले
महाराष्ट्रात शिंदेंनी शिवसेनेचे 40 आमदार फोडले., तसंच बिहारमध्ये आरसीपी सिंह नितीश कुमारांच्या जेडीयूचे 32 आमदार फोडण्याची चर्चा होती. सूत्रांनुसार शिंदेंच्या बंडाआधीच महाराष्ट्रात मोठ्या राजकीय उलथा-पालथी होऊ शकतात, याची माहिती गुप्तचर विभागानं ठाकरेंना दिली होती.
मुंबई : इकडे महाराष्ट्रात सत्तेचा विस्तार झाला. तिकडे बिहारमध्ये सत्तेत फेरफाराची तयारी झाली. या दोष्टी एकाच दिवशी घडल्या आणि या दोन्ही गोष्टींमध्ये एक समान धागाही होता. सूत्रांच्या माहितीनुसार बिहारमध्येही नितीश कुमारांचा(Nitish kumar) उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) करण्याचा प्लॅन होता, मात्र टेप केलेल्या एका फोनकॉलमुळे नितीश कुमार अॅक्टिव्ह झाले., आणि ज्यांनी डाव रचला होता. त्यांच्यावरच तो डाव उलटला.
महाराष्ट्रात ठाकरे जितके गाफिल राहिले. त्याहून कैक पटीनं नितीश कुमार सावध होते. म्हणून बंडाआधीच त्यांना बंडाच्या मुळावरच घाव घातला. ज्याप्रमाणेत महाराष्ट्रात शिंदेंनी शिवसेनेचे 40 आमदार फोडले., तसंच बिहारमध्ये आरसीपी सिंह नितीश कुमारांच्या जेडीयूचे 32 आमदार फोडण्याची चर्चा होती
सूत्रांनुसार शिंदेंच्या बंडाआधीच महाराष्ट्रात मोठ्या राजकीय उलथा-पालथी होऊ शकतात, याची माहिती गुप्तचर विभागानं ठाकरेंना दिली होती. बिहारमध्ये मात्र नितीश कुमार फक्त एका फोनकॉलनं सावध झाले., आणि त्यांनी षडयंत्राविरोधातच नवं षडयंत्र रचलं..
असं म्हणतात की आरसीपीसी सिंह भाजपच्या मदतीनं बिहारमध्ये ‘आरसीपी मिशन 32’ राबवून नितीश सरकार पाडणार होते. पण त्याआधीच नितीश कुमारांनी प्लॅन आरसीपी राबवून आरसीपी सिंह आणि भाजपलाच दूर केलं.
राजकारण हा शह-काटशहांचा आखाडा आहे…तिथं रोजची संध्याकाळ षडयंत्रांनी मावळते आणि रोजची सकाळ नव्या षडयंत्रांनी उगवते. या षडयंत्रांवर पाय देऊन जीवंत राहणाराच राजकारणात तग धरतो. ठाकरेंना बंडाची कल्पना असूनही त्यांच्याडोळ्या देखत बंड झालं आणि नितीश कुमारांनी जी फांदी बंडाचं निशाण फडकवू पाहत होती. तिला फाटे फुटण्याआधीच तिच्या मुळावर कुऱ्हाड घातली.