काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर

काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर

| Updated on: Apr 16, 2024 | 3:24 PM

काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिम समजाला प्राधान्य देणारा असल्याचे भाजपने म्हटले होते. काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहिरनाम्यावर भाजपने टीका केली होती. त्यावर शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले उद्धव ठाकरे ? काय केला पलटवार? बघा व्हिडीओ....

काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहिरनाम्यावर भाजपने टीका केली होती. काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिम समजाला प्राधान्य देणारा असल्याचे भाजपने म्हटले होते. त्यावर शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, मुस्लिम लीगचा अनुभव भाजपाला जास्त आहे. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात 1940-42 मध्ये स्वातंत्र्यासाठी लढणारी काँग्रेस नको, म्हणून पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम लीगसोबत सरकार स्थापन केलं. त्यामुळे ते जुनं नात कायम असू शकतं. गेल्या काही दिवसांपूर्वी आरएसएस प्रमुख मोहन भागवत जामा मशिदीत गेल्याचे फोटो आले. नरेंद्र मोदी सुद्धा मशिदीत गेले होते त्यामुळे ते कोणत्या दृष्टीकोनातून त्याकडे बघतात हा त्यांचा मुद्दा आहे, असे म्हटले तर महाविकास आघाडीचा संयुक्त वचननामा लवकरच येणार आहे. काँग्रेस देशभरासाठी जाहीरनामा जाहीर केला आहे. काँग्रेसचा हा जाहीरनामा सर्वसमावेश आहे. त्यात काही गोष्टी अजून टाकायच्या असतील तर आम्ही टाकू, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Published on: Apr 16, 2024 03:24 PM