गलती से मिस्टेक... संजय राऊत चुकीनं प्रसाद लाड यांच्या कारमध्ये बसले अन्..., व्हिडीओ होतोय व्हायरल

गलती से मिस्टेक… संजय राऊत चुकीनं प्रसाद लाड यांच्या कारमध्ये बसले अन्…, व्हिडीओ होतोय व्हायरल

| Updated on: Dec 12, 2023 | 2:48 PM

नागपूरच्या रेडिसन ब्लू हॉटेलबाहेर उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि भाजप नेते प्रसाद लाड एकाच वेळी आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी संजय राऊत चुकीनं प्रसाद लाड यांच्या कारमध्ये बसले आणि तोच व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय

नागपूर, १२ डिसेंबर २०२३ : नागपूरच्या रेडिसन ब्लू हॉटेलबाहेर उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि भाजप नेते प्रसाद लाड एकाच वेळी आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी संजय राऊत चुकीनं प्रसाद लाड यांच्या कारमध्ये बसले आणि तोच व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान याप्रकारानंतर मिलिंद नार्वेकर यांनी संजय राऊत यांना सांगितल्यानंतर त्यांनी कार बदलली. यानंतर हॉटेलबाहेर एकच हास्यकल्लोळ झाला. नागपूरच्या रेडिसन ब्लू हॉटेलबाहेरून उद्धव ठाकरे यांच्या सोबत संजय राऊत हे एकाच कारमधून जाताना दिसले. तर यावेळी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना प्रसाद लाड यांना सोडू नको, असा खोचक सल्लाही दिल्याचे पाहायला मिळाले. याच हॉटेलमधून उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या भेटीसाठी निघाले आहेत. तर नागपुरात होत असलेल्या या आंदोलनाच्या ठिकाणी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी भेट दिली.

Published on: Dec 12, 2023 02:08 PM