ठाकरेंना वेड लागलं... उद्धव ठाकरेंच्या 'त्या' मोठ्या गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर

ठाकरेंना वेड लागलं… उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ मोठ्या गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर

| Updated on: Apr 21, 2024 | 11:27 AM

अमित शाह यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. त्यावेळी फडणवीसांनी आदित्यला मुख्यमंत्री करून दिल्लीला जाणार असल्याचे म्हटले होते, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केलाय. तर उद्धव ठाकरेंना वेड लागल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवरून मोठा गौप्यस्फोट केलाय. अमित शाह यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. त्यावेळी फडणवीसांनी आदित्यला मुख्यमंत्री करून दिल्लीला जाणार असल्याचे म्हटले होते, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केलाय. तर उद्धव ठाकरेंना वेड लागल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी अडीच-अडीच वर्षांवरून मोठा गौप्यस्फोट केला. अमित शाह यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला तर आदित्यला मुख्यमंत्री पदासाठी तयार करून दिल्लीला जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले, असा दावा ठाकरेंनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलाय. ‘मी माझ्या वडिलांना वचन दिलं होतं की, शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार…मात्र भाजपनंच मलाच माझ्या लोकांसमोर खोटं पाडलं.’, असे म्हणत ठाकरेंनी दावा केला.

Published on: Apr 21, 2024 11:27 AM