उद्धव ठाकरेंचे शिलेदार आणि सेक्रेटरी शिंदेंचे सहकारी होणार? मिलिंद नार्वेकर शिवसेनेच्या वाटेवर?

उद्धव ठाकरेंचे शिलेदार आणि सेक्रेटरी शिंदेंचे सहकारी होणार? मिलिंद नार्वेकर शिवसेनेच्या वाटेवर?

| Updated on: Apr 22, 2024 | 11:30 AM

उद्धव ठाकरेंचे विश्वासू आणि सेक्रेटरी लवकरच शिंदेंच्या शिवसेनेचे सहकारी होतील, अशा चर्चांना उधाण आले आहे. त्यावरून मिलिंद नार्वेकर आणि उद्धव ठाकरे या दोघांनी बोलणं टाळल्यामुळे चर्चांना अजून बळ मिळालंय. असं प्रत्यक्षात घडल्यास उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार?

उद्धव ठाकरेंचे विश्वासू आणि सेक्रेटरी लवकरच शिंदेंच्या शिवसेनेचे सहकारी होतील, अशा चर्चांना उधाण आले आहे. त्यावरून मिलिंद नार्वेकर आणि उद्धव ठाकरे या दोघांनी बोलणं टाळल्यामुळे चर्चांना अजून बळ मिळालंय. असं प्रत्यक्षात घडल्यास उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार असल्याचे म्हटलं जातंय. कालपासून या चर्चा सुरू असताना मिलिंद नार्वेकर यांनी मोतोश्रीची भेट घेतली. या भेटीनंतर मिलिंद नार्वेकर यांनी मौन बाळगल्याने चर्चांना बळ मिळालंय. नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे अतंत्य विश्वासू मानले जातात. अनेक वर्षांपासून ते ठाकरेंचे स्वीय सचिव म्हणून काम पाहताय. ठाकरेंसह शिंदेंसोबतही नार्वेकरांचे चांगले संबंध आहेत. अशी चर्चा आहे की, त्यांना शिंदे गटात प्रवेश देत त्यांना दक्षिण मुंबईतील जागेवर लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे. अद्याप महायुतीकडून त्या जागेवर कोणताही उमेदवार दिलेला नाही. ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अरविंद सावंत यांचं नाव घोषित करण्यात आलंय. त्यामुळे यांच्या विरोधात शिवसेनेकडूव नार्वेकरांना उमेदवारी मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Published on: Apr 22, 2024 11:30 AM