‘आपला पक्ष काँग्रेस झालाय’, बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटाला घरचा आहेर, ऑडिओ व्हायरल
१० ते १५ वर्ष पदाधिकारीही मस्तपैकी एकाच पदावर आहेत. जे पदाधिकारी काम करत नाहीत त्यांना बाजूला करायची आमच्यात हिंमत नाही. काम न करणार्याला तो नाराज होऊ नये म्हणून दुसरं पद दिलं जातं, असा खळबळजनक दावा उद्धव ठाकरेंच्या नेत्याने केलाय
शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे, असं वक्तव्य पक्षातील एका बड्या नेत्यानं केलंय. पदाधिकार्यांच्या बैठकीत भास्कर जाधव यांनी असे खडेबोल सुनावले आहेत. चिपळूण येथे कार्यकर्ता बैठक झाली. त्यात ते बोलत होते. इतकंच नाहीतर भास्कर जाधव यांनी आपल्या पक्षाला दिलेल्या घरच्या आहेराबद्दल चांगलीच राजकीय वर्तुळात चर्चा होत असून त्यांच्या भाषणाची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत शाखाप्रमुख कुठे आहेत? असा थेट सवालच भास्कर जाधव यांनी केलाय. १० ते १५ वर्ष पदाधिकारीही मस्तपैकी एकाच पदावर आहेत. जे पदाधिकारी काम करत नाहीत त्यांना बाजूला करायची आमच्यात हिंमत नाही. काम न करणार्याला तो नाराज होऊ नये म्हणून दुसरं पद दिलं जातं, असा खळबळजनक दावा भास्कर जाधव यांनी केला. तर जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत, असंही म्हणत भास्कर जाधव यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. ऐका ऑडिओ नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव…