ठाकरे गटाचे मुंबईतील संभाव्य 22 उमेदवार ठरले, कोण कोणत्या मतदारसंघातून विधानसभा लढणार?

ठाकरे गटाचे मुंबईतील संभाव्य 22 उमेदवार ठरले, कोण कोणत्या मतदारसंघातून विधानसभा लढणार?

| Updated on: Sep 05, 2024 | 4:38 PM

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना दिसताय. अशातच आता ठाकरे गटाचे मुंबईतले संभाव्य उमेदवार ठरल्याची माहिती मिळतेय. मुंबईतील ठाकरे गटाच्या संभाव्य 22 उमेदवारांची यादी टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाचे मुंबईतील संभाव्य उमेदवार ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. मुंबईत विधानसभेच्या एकूण ३६ जागा आहेत. या जागांपैकी ठाकरे गट २२ जागांवर निवडणूक लढवण्यास इच्छुक असून ठाकरे गटाची २२ नावांवर प्राथमिक चर्चा झाली असून ठाकरे गटाच्या संभाव्य २२ उमेदवारांची यादी टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे. दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीत १४ जागांवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला होता. तर मुंबई हा ठाकरेंचा बालेकिल्ला असून लोकसभा निवडणुकीच्यावेळी ठाकरे गटाने तीन जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाची कसोटी लागणार आहे. ठाकरेला स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक जास्त महत्त्वाची असणार आहे. बघा कोण आहेत, मुंबईतील ठाकरे गटाच्या संभाव्य २२ उमेदवार?

Published on: Sep 05, 2024 04:38 PM