Shivsena UBT March : ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
Water Crisis in Mumbai : मुंबईत पाणीबाणी सुरू आहे. नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आज उद्धव ठाकरे गटाकडून आक्रमक पवित्रा घेत हंडा मोर्चा काढण्यात आला आहे.
मुंबईत पाण्याचा प्रश्न गंभीर होत असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत आज पालिका कार्यालयावर हंडा मोर्चा काढला आहे. आमदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील केली जात आहे. जोपर्यंत पाणी नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, अशा आशयाचे बॅनर आंदोलकांच्या हातात बघायला मिळत आहे. यावेळी आंदोलक आक्रमक झाल्याने पोलीस आणि आंदोलकांत धरपकड झाली. यावेळी जोरदार घोषणाबाई देखील करण्यात येत आहे.
Published on: Apr 15, 2025 04:36 PM
Latest Videos

पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र

भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'

पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
