तर उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेबद्दल बोलूच नये, भाजप नेत्यानं फटकारलं अन् म्हणाले
VIDEO | भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांची उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका, नैतिकतेबद्दल काय केलं भाष्य?
अहमदनगर : राज्याच्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) काल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अनेक निरीक्षणे नोंदवली. व्हीप, राज्यपालांची भूमिका आणि प्रतोद या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाच्या टिपण्या केल्या. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, मी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपसोबत निवडून आला आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेला, तेव्हा नैतिकता कुठे गेली होती. तुम्ही नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. अशातच ‘2019 मध्ये ज्यांना नैतिकता हा शब्द देखील आठवला नाही त्यांनी आता नैतिकतेबद्दल बोलू नये, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. नैतिकता पाळण्याचं आवाहन तोच करू शकतो ज्यांनी नैतिकता पाळलेली असते, असे देखील माधव भंडारी म्हणाले आहेत.