आनंद निरगुडे यांच्यावर कोणत्या मंत्र्यांचा दबाव? उद्धव ठाकरे यांचा थेट सरकारवर निशाणा
राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि माजी न्यायामूर्ती आनंद निरगुडे यांनी 4 डिसेंबर रोजीच राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा 9 डिसेंबरला स्वीकारण्यात आल्याचे समोर आले. यावरूनच उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारने आनंद निरगुडे यांचा राजीनामा का लपवून ठेवला?
नागपूर, १२ डिसेंबर २०२३ : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायामूर्ती आनंद निरगुडे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा आज राजीनामा दिला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि माजी न्यायामूर्ती आनंद निरगुडे यांनी 4 डिसेंबर रोजीच राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा 9 डिसेंबरला स्वीकारण्यात आल्याचे समोर आले. यावरूनच उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारने आनंद निरगुडे यांचा राजीनामा का लपवून ठेवला? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. पुढे ते असेही म्हणाले की, हा राजीनामा काही मंत्र्यांच्या दाबाने दिला. तर हे मंत्री कोण आहेत? या मंत्र्याची नावं समोर आली पाहिजे अशी मागणी करत हा राजीनामा काही दिवसांपूर्वी देण्यात आला होता. पण तो लपवून ठेवण्यात आला. तर आयोगातील काही सदस्यांचं म्हणणं आहे की, सरकार आयोगात हस्तक्षेप करतंय… यावर बोलताना ठाकरे म्हणाले, हा हस्तक्षेप नेमका कोणाचा आहे हे कळलं पाहिजे.