गर्दी, रिकाम्या खुर्च्या, पंक्चर रिक्षा अन् ट्रिपल इंजिन…उद्धव ठाकरेंची भाजपसह विरोधकांवर सडकून टीका
पुढे उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शाह यांनी नवा शोध लावला, महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा...पण ठीके आमची रिक्षा पंक्चर झालेली असेल पण तुमचं तर...
लातूर | 7 मार्च 2024 : उद्धव ठाकरे दोन दिवसाच्या धाराशिव आणि लातूरच्या दौऱ्यावर आहेत. आज उद्धव ठाकरे हे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात होते. यावेळी एका सभेला संबोधित करताना त्यांनी अमित शाह यांच्यासह भाजपवर त्यांनी सडकून टीका केली. मुख्यमंत्री नाहीत, पण मुख्यमंत्री असल्यासारखेच फिरतात अशी टीका गद्दारांनी केली असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आणि नाव न घेता विरोधकांवर हल्लाबोल करत ठाकरे म्हणाले, बरोबर आहे. मी मुख्यमंत्री नाही. कारण मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रिकाम्या खुर्च्या असतात. माझ्या सभांना प्रचंड गर्दी असते. त्यामुळे मी मुख्यमंत्री नाहीये हे मला माहीत आहे. पुढे उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शाह यांनी नवा शोध लावला, महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा…पण ठीके आमची रिक्षा पंक्चर झालेली असेल पण तुमचं तर भ्रष्टाचाराचं ट्रिपल इंजिन आहे. सगळे भ्रष्टाचारी तितुका मेळवावा, भाजपा धर्म वाढवावा, असे अमित शाह आणि मोदी यांचं चाललंय असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.