Rane vs Thackeray | उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे यांचा चिपी विमानतळ सोहळ्यातील महासामना

Rane vs Thackeray | उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे यांचा चिपी विमानतळ सोहळ्यातील महासामना

| Updated on: Oct 09, 2021 | 6:27 PM

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे हे तब्बल 16 वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आले.

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे हे तब्बल 16 वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आले. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील वैर संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं या कार्यक्रमाकडे लक्ष होतं. या कार्यक्रमात राणे आणि ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे अनेकांचं लक्ष होतं.

अखेर या कार्यक्रमात बोलताना नारायण राणे यांनी शिवेसेनेवर नाव न घेता निशाणा साधला. त्यानंतर भाषणासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील एकाच मंचावर असताना नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिलं. आपल्या भाषणात बोलताना मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे यांचं कधी नाव घेत तर कधी नाव न घेत टोला लगावला. विशेष म्हणजे राणेंच्या कोकणातील होमपीचवर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर टीका केली.