मी औरंगजेबाचा फॅन…, विरोधकांच्या ‘त्या’ टीकेवर उद्धव ठाकरेंचा पलटवार काय?
'जसे हे दिल्लीत गेले तसे औरंगजेब हा आग्ग्रात होता. औरंगजेबसुद्धा महाराष्ट्र जिंकण्यासाठीच इकडे 27 वर्षे प्रयत्न करत होता. औरंगजेबाने त्या वेळी रोड-शो-बिड शो काही केले असतील, सभा घेतल्या असतील तर त्याची कल्पना नाही मला, पण महाराष्ट्र जिंकण्यासाठी तो इकडे 27 वर्षे बसला होता. पण...'
उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांसोबत गेले असल्याची टीका विरोधकांकडून होत असताना उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय. ‘औरंगजेबाच्या विचाराने पुढे जात असून उद्धव ठाकरे आता औरंगजेब फॅन्स क्लबचे मेंबर झालेत असा हल्लाबोल विरोधकांकडून होत असताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘कारण त्यांना त्यांचा आवडता केक जो पाकिस्तानात जाऊन त्यांनी नवाज शरीफ यांच्या वाढदिवशी खाल्ला होता, त्याची आठवण होते. बिनबुलाये मेहमान बनून पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफांच्या वाढदिवसाचा केक खाणारी लोकं मला औरंगजेबाचा फॅन म्हणू शकत नाहीत. कारण औरंगजेबसुद्धा गुजरातमध्येच जन्मला होता. जसे हे दिल्लीत गेले तसे औरंगजेब हा आग्ग्रात होता. औरंगजेबसुद्धा महाराष्ट्र जिंकण्यासाठीच इकडे 27 वर्षे प्रयत्न करत होता. औरंगजेबाने त्या वेळी रोड-शो-बिड शो काही केले असतील, सभा घेतल्या असतील तर त्याची कल्पना नाही मला, पण महाराष्ट्र जिंकण्यासाठी तो इकडे 27 वर्षे बसला होता. पण तो पुन्हा कधीच आग्ग्राला जाऊ शकला नव्हता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण त्या वेळी औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापण्याचं जे शौर्य मराठ्यांनी गाजवलं, ते मराठे व त्यांचेच वंशज आजही महाराष्ट्रात जिवंत आहेत.’, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पलटवार केलाय.