Uddhav Thackeray : ‘त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही’, उद्धव ठाकरेंचा संभाजी भिडेंना खोचक टोला
इतिहासाचा अभ्यास कमी असणारे लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत चुकीची माहिती देत आहे. असं म्हणत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी शिवाजी महाराज हिंदू धर्माच्या रक्षणासाठी होते, पण महाराजांवर सर्वधर्म समभाव हे चिकटवले आहे,असं वक्तव्य केलं.
‘शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, शिवाजी महाराज हिंदू धर्माच्या रक्षणासाठी होते. शिवाजी महाराजांवर सर्वधर्म समभाव हे चिकटवले आहे’, असे वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी काल केल्याचे पाहायला मिळाले. यासंदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी उद्धव ठाकरे यांना सवाल केला असता ठाकरेंनी एका वाक्यात उत्तर देत संभाजी भिडे यांना फटकारल्याचे पाहायला मिळाले. ‘त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही. त्यामुळे त्यांच्या बद्दल बोलायचं नाही.’, असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि संभाजी भिडे यांना खोचक टोला लगावल्याचे पाहायला मिळाले. 2018 साली संभाजी भिडे यांनी एक वक्तव्य केलं होतं. “माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते,” असं अजब गजब दावा संभाजी भिडे यांनी केला होता. नाशिकमध्ये झालेल्या एका सभेत त्यांनी हे विधान केलं होतं.
असं होतं ते वक्तव्य
“भगवंताची कृपा आहे ही मला एक कोय मिळाली. त्या कोईचं रोपटं करुन आता त्याचं झाडं झालं. ते आंब्याचं झाड माझ्याकडे आहे. त्याची काय मजा आहे, ते सांगतो तुम्हाला. अहो, लग्न होऊन 8-8, 10-10, 12-12 वर्ष झालेल्यांना सुद्धा पोर होत नाही, अशा स्त्री-पुरुषांनी, पती पत्नींनी ती फळं खाल्ली, तर निश्चित पोर होईल. असं झाड आहे माझ्याकडे. रोज आंबे आणून, माझ्याही बागेत, शेतात ते लावले. मी आता तुम्हाला सोडलं तर माझ्या आईशिवाय कोणाला सांगितलं नाही, ते आंबे कसे आहेत. ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल. अपत्य नसेल तर होते. असा हा आंबा आहे. म्हणजे त्याचा अर्थ नपुंसकत्वावर तोडगा आणि वंध्यत्वावरचा ताकद देणारा तो आंबा आहे.”

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल

दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय

साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा

मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
