कडवट शिवसैनिकाच्या लग्नात तेजस ठाकरे नाचणार का? अंबानींच्या कार्यक्रमातील 'त्या' व्हिडीओवरून घेरलं

कडवट शिवसैनिकाच्या लग्नात तेजस ठाकरे नाचणार का? अंबानींच्या कार्यक्रमातील ‘त्या’ व्हिडीओवरून घेरलं

| Updated on: Jul 10, 2024 | 11:31 AM

मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नातील संगीत सोहळ्यामधला हा व्हिडीओ आहे. या सोहळ्याला पूर्ण ठाकरे कुटुंब हजर होते. मात्र एकीकडे मराठी विरूद्ध गुजराती असा भेद तयार करायचा...आणि अंबानींच्या लग्नात नाचायचं... यावरून भाजपच्या नितेश राणेंनी ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या लहान मुलगा तेजस ठाकरे याचा अंबानीच्या लग्नातला एक डान्स व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीओवरून राजकारण देखील तापलंय. मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नातील संगीत सोहळ्यामधला हा व्हिडीओ आहे. या सोहळ्याला पूर्ण ठाकरे कुटुंब हजर होते. मात्र एकीकडे मराठी विरूद्ध गुजराती असा भेद तयार करायचा…आणि अंबानींच्या लग्नात नाचायचं… यावरून भाजपच्या नितेश राणेंनी ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. ठाकरे असो किंवा कुणीही असो कुणी कुणाच्या लग्नात नाचावं..अमिताभ बच्चन यांनी कुणाच्या लग्नात वाढाव.. सलमान आणि शाहरूखने कुणाच्या कार्यक्रमात एकत्रित यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण तेजस ठाकरे इतक्याच उत्साहाने एखाद्या कडवट शिवसैनिकाच्या लग्नामध्ये ताल धरतील का? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jul 10, 2024 11:31 AM