'उद्धव ठाकरेंना दगा मिळण्यास घरातूनच सुरुवात', नितेश राणेंची खोचक टीका

‘उद्धव ठाकरेंना दगा मिळण्यास घरातूनच सुरुवात’, नितेश राणेंची खोचक टीका

| Updated on: Jul 06, 2022 | 1:35 PM

नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबीयांवर पुन्हा एकदा खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना दगा मिळायला घरातूनच सुरुवात झाल्याचं त्यांनी म्हटलंय. नाव न घेता नितेश राणेंनी वरुण सरदेसाईंवर गंभीर आरोप केले आहेत.

नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबीयांवर पुन्हा एकदा खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना दगा मिळायला घरातूनच सुरुवात झाल्याचं त्यांनी म्हटलंय. नाव न घेता नितेश राणेंनी वरुण सरदेसाईंवर गंभीर आरोप केले आहेत. “उद्धव ठाकरे म्हणतात की मला शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांनी दगा दिला. मी उद्धवजींना सांगेन की दगा नेमका कोणी दिला हे खऱ्या अर्थाने तुम्हाला पाहायचं असेल तर आपण आपल्या घरापासून आधी सुरुवात केली पाहिते. आपल्या अवतीभोवती असलेले, जे कधीही निवडून न येणारे लोक आहेत, त्यांनीच तुम्हाला दगा दिला हे उद्धवजींना कळलंच नाही. सुरुवात करायची असेल तर आपल्या भाच्यापासून सुरुवात करा”, असं ते म्हणाले.