‘अरे मिंध्या तुझ्यासमोर महाराष्ट्र ओरबाडाला जातोय, तू शेपूट हलवत..’ उद्धव ठाकरे कडाडले
उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथे शिवसैनिकांच्या महाअधिवेशनानंतर सायंकाळी जाहीर सभा घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गुजरात आणि देश अशी भिंत मोदी उभी करीत आहेत. गुजरातला मदत करायला काही हरकत नाही. परंतू महाराष्ट्राच्या वाटचे का ओरबाडताय ? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
नाशिक | 23 जानेवारी 2024 : मोदी आता महाराष्ट्राच्या वाऱ्या करीत आहेत. मणिपूरला लोकसभेच्या दोनच जागा आहेत. परंतू महाराष्ट्रात मतासाठी येत आहेत. महाराष्ट्र तुम्ही लुटत आहात. गुजरातला द्यायला हरकत नाही. परंतू महाराष्ट्राच्या हक्काचं का ओरबडताय. हे मिंधे बोलतात की मी बाळासाहेबांचे विचार सोडले. अरे मिंध्या महाराष्ट्र ओरबाडाला जातोय, तू शेपूट हलवत दिल्लीची चाकरी करतोयस अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या हल्ला चढवला आहे. महाराष्ट्रावर तोक्ते वादळ, निसर्ग चक्रीवादळ आले. तेव्हा गुजरातला न मागता पैसे मिळाले आणि महाराष्ट्राला ठेंगा मिळाला. देश के लिए मन की बात आणि गुजरात के लिए धन की बात अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.
Published on: Jan 23, 2024 08:55 PM
Latest Videos