सरकारकडून थापेबाजी... ठाकरेंचा 'लाडकी बहीण'वरून निशाणा अन् खोतकरांच्या 'त्या' व्हिडीओचा दिला दाखला

सरकारकडून थापेबाजी… ठाकरेंचा ‘लाडकी बहीण’वरून निशाणा अन् खोतकरांच्या ‘त्या’ व्हिडीओचा दिला दाखला

| Updated on: Jul 07, 2024 | 5:56 PM

सरकारकडून केवळ थापेबाजीचा कारभार सुरू असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून जोरदार निशाणा साधला आहे. इतकंच नाहीतर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी अर्जून खोतकर यांचा एक व्हायरल व्हिडीओ दाखवत त्याचा दाखलाही त्यांनी दिला. दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी इतर पक्षांचे कार्यकर्ते काम हातात घेण्यापूर्वी गावागावात जाऊन योजना राबवण्यासाठी नाटक करा, असा अजब […]

सरकारकडून केवळ थापेबाजीचा कारभार सुरू असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून जोरदार निशाणा साधला आहे. इतकंच नाहीतर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी अर्जून खोतकर यांचा एक व्हायरल व्हिडीओ दाखवत त्याचा दाखलाही त्यांनी दिला. दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी इतर पक्षांचे कार्यकर्ते काम हातात घेण्यापूर्वी गावागावात जाऊन योजना राबवण्यासाठी नाटक करा, असा अजब सल्ला अर्जून खोपकर यांनी दिला असल्याचा व्हिडीओ उद्धव ठाकरे यांनी दाखवला.

जालन्यात शिवसेना उपनेते माजी राज्य मंत्री अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची तातडीची बैठक घेतली होती. या बैठकीत ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ या योजनेसाठी गावागावात फिरा, प्रत्येक घराघरात फिरा, वाटेल ते नाटकं करा, मुद्दामहून महिलांचे आधार कार्ड घ्या, पॅन कार्ड घ्या, ही योजना समजून सांगा. आपण ही योजना गावात पहिली आणली असं भासवा. इतर पक्षाच्या आधी काम सुरु करा, आपण काम सुरु केलं नाही तर ते दुसरे काम करतील, असा सल्ला देणारा खोतकराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Published on: Jul 07, 2024 05:56 PM