तेव्हा एकनाथ शिंदे यांचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच…; राजन विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे 2013 सालीच चार आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. मात्र त्यावेळी आम्ही काँग्रेसच्या तिकीटावर कसे निवडून येणार? असं चार आमदारांनी विचारलं, त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं बंड फसलं, असा मोठा गौप्यस्फोट राजन विचारे यांनी केला.
एकनाथ शिंदे २०१३ मध्येच काँग्रेसमध्ये जाणार होते मात्र आमदार फिरले आणि एकनाथ शिंदे यांचं बंड फसलं, असा दावा ठाकरेंचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केला आहे. एकनाथ शिंदे 2013 सालीच चार आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. मात्र त्यावेळी आम्ही काँग्रेसच्या तिकीटावर कसे निवडून येणार? असं चार आमदारांनी विचारलं, त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं बंड फसलं, असा मोठा गौप्यस्फोट राजन विचारे यांनी केला. तर एकनाथ शिंदे 2013 सालीच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. कुठल्या पक्षाशी तुम्ही प्रामाणिक राहिलात? स्वत:सह मिळून पाच आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, असा दावा करून राजन विचारे यांनी सनसनाटी निर्माण केली. एकनाथ शिंदे यांना शिवसेना संपवायची होती. तुम्ही काय पक्ष वाढवला? जिल्ह्यात किती आमदार होते? सेटिंग करत राहिलात, याला फोडं, त्याला फोडं, कुठला पक्ष सोडलात सांगा, अशा शब्दात राजन विचारे यांनी हल्ला चढवला.