तर सोन्याहून पिवळं होईल म्हणत उद्धव ठाकरे यांनी मानले एकनाथ शिंदे यांचे आभार

तर सोन्याहून पिवळं होईल म्हणत उद्धव ठाकरे यांनी मानले एकनाथ शिंदे यांचे आभार

| Updated on: Feb 20, 2024 | 7:13 PM

गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे हे बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत, अशी टीका केली जात होती. पण आज त्यांनी मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद मानले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

मुंबई, २० फेब्रुवारी २०२४ : गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे हे बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत, अशी टीका केली जात होती. पण आज त्यांनी मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद मानले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. ते म्हणाले, “मला राजकारणाबाबत जास्त काही बोलायचं नाही. कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलंय, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. एकच प्रार्थना करतो की, पूर्वीचे सर्व अनुभव लक्षात घेऊन हे आरक्षण कायद्याच्या सर्व पातळीवर टिकेल. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळेल, अशी मी आशा बाळगतो” पुढे ते असेही म्हणाले, “हे आरक्षण शिक्षण आणि नोकरीत दिलं आहे. शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यावर याबाबत स्पष्ट होईल. पण तातडीने आता किती जणांना मराठा समाजातील तरुणांना कुठे नोकरी मिळणार हे सरकारने सांगितलं तर सोन्याहून पिवळं होईल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Published on: Feb 20, 2024 07:12 PM