उद्धव ठाकरे यांचं नाशिकमध्ये जंगी स्वागत, काळाराम मंदिरात घेतलं रामाचं दर्शन अन् गोदातीरी महाआरती
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनादेखील निमंत्रण देण्यात आलं होतं. पण उद्धव ठाकरे यांचा आज नियोजित नाशिक दौरा असल्याने ते अयोध्येला हजर नव्हते. दरम्यान, आजच्या अयोध्येला मंदिराच्या उद्घाटनाला जाणार नाहीत, पण नंतर नक्की जाणार असल्याचे म्हटले
नाशिक, २२ जानेवारी, २०२४ : अयोध्येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना कऱण्यात आली. या सोहळ्याला अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आलं होतं. तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनादेखील निमंत्रण देण्यात आलं होतं. पण उद्धव ठाकरे यांचा आज नियोजित नाशिक दौरा असल्याने ते अयोध्येला हजर नव्हते. दरम्यान, आजच्या अयोध्येला मंदिराच्या उद्घाटनाला जाणार नाहीत, पण नंतर नक्की जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आज नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी आपल्या कुटुंबासह काळाराम मंदिरात रामाचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, त्यांचा भाऊ तेजस ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते. काळाराम मंदिरात उद्धव ठाकरे यांनी सपत्निक पूजा केली. यानंतर त्यांनी गोदातीरी महाआरती देखील केली.