महाराष्ट्रात राख, गुजरातमध्ये रांगोळी का? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी काय दिला इशारा?
VIDEO | हुकूमशाही करण्याचा प्रयत्न कराल तर ...., उद्धव ठाकरे यांनी बारसू-सोलगाव येथील आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर विरोधकांना दिला इशारा
रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसू-सोलगाव येथील आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच कातळ शिल्प परिसरालाही भेट दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. स्थानिक नागरिकांचा विरोध असेल तर बारसू रिफायनरीसारखे प्रकल्प राज्यात नको. महाराष्ट्रात राख आणि गुजरातमध्ये रांगोळी का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ‘आपण अनेक उद्योग महाराष्ट्रात आणत होतो. पण ते सगळे उद्योग कुठे गेले. माझे म्हणणं आहे की हा प्रकल्प गुजरातला न्या आणि चांगला प्रकल्प इकडे आणा. म्हणजे जे वादग्रस्त प्रकल्प नाहीत ते गुजरातला आणि जे वादग्रस्त आहे ते कोकणाच्या माथी मारतायेत. पण हे चालणार नाही. पण तुम्ही काळजी करू नका. लोकांचे मुडदे पडणार असा विकास मला मान्य नाही. त्यामुळे तुम्ही मजबूत रहा…ज्या काही अटक वैगरे आहे , ही काही हुकूमशाही नाही. हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न केला तर हुकूमशाही तोडून टाकेन महाराष्ट्र पेटवून यांना आपण हाकलून देऊ ‘, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.