'सावरकर आमचे दैवत अन्...', भरसभेत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना खडसावलं

‘सावरकर आमचे दैवत अन्…’, भरसभेत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना खडसावलं

| Updated on: Mar 26, 2023 | 9:15 PM

VIDEO | उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भरसभेत जाहीरपणे सावरकरांच्या मुद्द्यावरून ठणकावलं, काय म्हणाले नेमकं बघा?

नाशिक : उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जाहीरपणे सावरकरांच्या मुद्द्यावरून चांगलेच खडसावल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्र सरकारवर आपल्या भाषणामधून जोरदार निशाणा साधला. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत आहे. त्यांचा अपमान सहन करणार नाही. आपण देशातील लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. पण सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही’, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पुढे ते असेही म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे केले ते येड्या गबाळ्याचे काम नाही. सावरकरांनी १४ वर्ष छळ सोसला. जसे आपले क्रांतीकारक बळी गेले. तशाच मरण यातना सावरकर १४ वर्ष सोसत आहे. आम्ही सावरकर भक्त आहोत. भाजपमध्येही काही सावरकरांचे भक्त आहेत तरी काही अंध भक्त झालेत, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.

Published on: Mar 26, 2023 08:55 PM