Jitendra Awhad | 2024 ला सुद्धा उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार : जितेंद्र आव्हाड
2024 ला महाविकास आघाडीचे सरकार येईल आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे
मुंबई : 2024 ला महाविकास आघाडीचे सरकार येईल आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना बसण्यासाठी खुर्ची आणून दिली. त्याचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोवरुन भाजप नेत्यांकडून संजय राऊत यांच्यावर खोचक टीका करण्यात येतेय. अशावेळी शिवसेना आणि खुद्द संजय राऊत यांच्याकडूनही भाजपला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राऊतांच्या कृतीबाबत त्यांना नमन केलंय. तसंच राऊतांकडून माणुसकीचं दर्शन झाल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
Published on: Dec 09, 2021 09:57 PM
Latest Videos