मुंबईत ठाकरे पिता-पुत्रांचे मेळावे, यासह जाणून घ्या दिवसभरातील अपडेट्स

मुंबईत ठाकरे पिता-पुत्रांचे मेळावे, यासह जाणून घ्या दिवसभरातील अपडेट्स

| Updated on: Feb 12, 2023 | 8:47 AM

आज उद्धव ठाकरे गोरेगावच्या उत्तर भारतीय समाजाच्या अभियानात हजर राहणार तर आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अंधेरीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा

मुंबई : शिंदे-फडणवीसांसह १५ मंत्री आज पोहरा देवीच्या दौऱ्यावर असणार आहेत. वाशिममध्ये ५९३ कोटी विकास कामांची पायाभरणीसह पोहरादेवीमध्ये संत सेवालाल यांच्या पुतळ्याचं अनावरणही करण्यात येणार आहे. काँग्रेसची आज मुंबईत बैठक होणार असून अंतर्गत वादावर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे, प्रभारी एच पी पाटील यांच्या उपस्थित ही बैठक होणार आहे. आज उद्धव ठाकरे गोरेगावच्या उत्तर भारतीय समाजाच्या अभियानात हजर राहणार आहेत. तर आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अंधेरीच्या पदाधिकाऱ्यांचा रंगशारदामध्ये मेळावा होणार आहे. तर आज मुंबईत भाजप कार्यकारणीची बैठक असून आशिष शेलार, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबई महापालिका निवडणुकीची रणनिती ठरणार आहे. तर वर्ध्यात आज राष्ट्रवादीच्या जनजागरण यात्रेचा समारोप होणार आहे.

Published on: Feb 12, 2023 08:46 AM