अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनाला जाणार की नाही? लोकार्पणाच्या निमंत्रणावरून ठाकरेंचा भाजपला टोला
अयोध्येतील राममंदिर कुणा एका पक्षाची खासगी प्रॉपर्टी नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. उद्धव ठाकरे यांनी आझाद मैदानातील अंगणवाडी सेविकांच्या सभेत बोलताना येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला ते उपस्थित राहणार नसल्याचे संकेत त्यांनी दिल्याचे पाहायला मिळाले.
मुंबई, ३ जानेवारी २०२४ : अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला जाणार, आमंत्रणाची गरज नाही. मनात येईल तेव्हा रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले. इतकंच नाही तर अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाच्या निमंत्रणावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपला खोचक टोलाही लगावला आहे. अयोध्येतील राममंदिर कुणा एका पक्षाची खासगी प्रॉपर्टी नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. उद्धव ठाकरे यांनी आझाद मैदानातील अंगणवाडी सेविकांच्या सभेत बोलताना येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला ते उपस्थित राहणार नसल्याचे संकेत त्यांनी दिल्याचे पाहायला मिळाले. येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होतंय. तुम्ही राम भक्त आहात की नाही? रामलल्लांचं दर्शन जरूर घ्या. मी सुद्धा जाणार आहे, मला आमंत्रणाची गरज नाही. पण दर्शन करून आल्यावर पुन्हा तोच प्रश्न येतो, तुमच्या मुला बाळांना काय देणार आहात? असा सवालही त्यांनी सरकारला केला.