CM Uddhav Thackeray: आता राज्यभर करारा जवाब मिळणार, उद्धव ठाकरे घेणार विभागवार सभा
रॅलीतून उद्धव ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंगही फुंकणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभांकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.
मुंबई: आजारपणातून बरे झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) पहिल्यांदाच आज जाहीर सभा घेणार आहे. या सभेतून ते अनेकांवर तोफ डागणार आहेत. शिवसेनेवर (shivsena) झालेल्या आरोपांचा समाचार घेतानाच शिवसेनेच्या पुढील वाटचालीवरही भाष्य करणार आहेत. याच रॅलीतून उद्धव ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंगही फुंकणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभांकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. बीकेसी येथे होणाऱ्या या सभेनंतर उद्धव ठाकरे राज्यात जिल्हावार सभा घेणार आहेत. शिवसेनेत नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आणि शिवसेनेचं संघटन मजबूत करण्यासाठी या सभा घेण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनीही जिल्हा जिल्ह्यात सभा घेण्याचं या आधीच जाहीर केलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ठाकरे बंधूंच्या तोफा राज्यभर धडाडताना दिसणार आहेत.