'...नंतर पुस्तक ग्रंथालयात जातं', शरद पवार यांच्या पुस्तकावर संजय राऊत यांचं भाष्य

‘…नंतर पुस्तक ग्रंथालयात जातं’, शरद पवार यांच्या पुस्तकावर संजय राऊत यांचं भाष्य

| Updated on: May 04, 2023 | 2:24 PM

VIDEO | शरद पवार यांच्या पुस्तकातील सेनेबाबतच्या भाष्याला ठाकरे सडेतोड उत्तर देणार, संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलं?

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन २ मे रोजी प्रकाशन झालं. या आत्मचरित्रातून मोठे दावे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. २०१९ मध्ये शहरी भागात शिवसेनेची ताकद कमी करून स्वबळ मिळवायचं हाच भाजपचा हिशेब होता असा दावा शरद पवार यांनी केला. तर शिवसेना भाजप युती का तुटली या दाव्यानं एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकातील शिवसेनेबाबत अर्थात उद्धव ठाकरे यांच्या भाष्याला आता ठाकरे सडेतोड उत्तर देणार असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तर ‘पुस्तक लोकं दोन दिवस वाचतात आणि नंतर ते पुस्तक ग्रंथालयात जातं.’, असे म्हणत संजय राऊत यांनी शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या पुस्तकातील मुंबईबाबतच्या भाष्यावर बोलताना टोला लगावला आहे.शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रपर पुस्तकातून अनेक राजकीय गौप्यस्फोट केले आहे. दरम्यान, या राजकीय आत्मचरित्रपर पुस्तकातून शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबाबत देखील भाष्य केलं आहे. तर शरद पवार यांनी केलेल्या भाष्यावर उद्धव ठाकरे देखील सडेतोड प्रत्युत्तर देणार आहे.

Published on: May 04, 2023 02:24 PM