फडणवीसांच्या वजनाने बाबरीचा ढाचा खाली आला असावा-उद्धव ठाकरे यांची खोचक टीका
बाबरी आंदोलनावरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात खंडाजंगी सुरुच आहे. बाबरी पडली तेव्हा भाजपवाले बिळात लपले होते अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण कारसेवेला हजर होतो तेथे आपल्याला शिवसेनेचे लोक कुठे दिसले नाहीत अशी टीका केली आहे. त्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत त्यांच्या वजनानेच बाबरी ढाचा खाली आल्याचे म्हटले आहे.
मुंबई | 30 डिसेंबर 2023 : एकीकडे राम मंदिराच्या 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावरून राजकीय वातावरण गरम झाले असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कलगीतुरा लागला आहे. बाबरी पडली तेव्हा भाजपवाले बिळात लपले होते अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यावरुन आज देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी आंदोलनात आपण तेथे हजर होतो. मला बदायू येतील तुरुंगात ठेवले होते. परंतू तेथे कुठे शिवसनेनेचे लोक दिसले नव्हते अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. यावरून शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वजनानेच बाबरीचा ढाचा पडला असावा अशी खोचक टीका केली आहे.
Published on: Dec 30, 2023 09:55 PM
Latest Videos

सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका

.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज

काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं

कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
