‘सोम्मयांना क्लीन चीट देणार का?’ ठाकरे गटाच्या नेत्याचा आक्षेपाहार्य व्हिडियो प्रकरणी थेट भाजपलाच सवाल
याचप्रकरणावरून विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर टीका केली आहे. तर भारतीय जनता पार्टी फक्त महाराष्ट्राच्या संस्कृतीवर गप्पा मारते असा निशाना त्यांनी साधला आहे.
मुंबई, 18 जुलै 2023 | भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपाहार्य व्हिडियो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यावरून आता विरोधकांकडून भाजपवर टीका होताना दिसत आहे. तर याचप्रकरणावरून विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर टीका केली आहे. तर भारतीय जनता पार्टी फक्त महाराष्ट्राच्या संस्कृतीवर गप्पा मारते असा निशाना त्यांनी साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदार भास्कर जाधव यांनी देखील यावरूनच भाजपसह किरीट सोमय्या यांच्यावर टीका केलीय. सोमय्या हे सध्या भ्रष्टाचार मुक्त भारत बनवायला निघाले होते. पण आज तेच अडचणीत आले आहेत. तर आता फडणवीस त्यांची चौकशी करणार का? असा सवाल त्यांनी केला आहे. त्याचबरोबर भाजपकडून देशात मापदंड घालून दिले जात आहेत. त्यामुळे सोम्मया भाजपचा मापदंड आहे का? असा सवाल करताना धनंजय मुंडेच्या बाबतीत करुणा शर्मा, संजय राठोडांच्या बाबतीत पुजा चव्हाण यांना न्याय मिळाला नाही. उलट धनंजय मुंडे, संजय राठोड यांना मंत्री केलं गेलं असा टोला लगावला आहे. तर भाजपकडून महिलांना न्याय मिळेल का? भाजप सोम्मयांना क्लीन चीट देणार का? असाही प्रश्न निर्माण झालाय असे जाधव यांनी म्हटलं आहे.