Dasara Melava : ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर दिसणार बाळासाहेब ठाकरे यांचा रथ
VIDEO | उद्धव ठाकरे गटाच्या मेळाव्याला दरवर्षी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा रथ आणणारे निष्ठावंत शिवसैनिक यंदाही शिवाजीपार्कवर पाहायला मिळणार आहे. गेल्या २७ वर्षांपासून उद्धव यादव आणि त्यांचे वडील हा बाळासाहेबांचा रथ ठाकरे गटाच्या मेळाव्यात आणतात
मुंबई, २४ ऑक्टोबर २०२३ | उद्धव ठाकरे गटाचा मेळावा आज शिवतीर्थावर पार पडणार आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे गटाच्या मेळाव्याला दरवर्षी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा रथ आणणारे निष्ठावंत शिवसैनिक यंदाही शिवाजीपार्कवर पाहायला मिळणार आहे. गेल्या २७ वर्षांपासून उद्धव यादव आणि त्यांचे वडील हा बाळासाहेबांचा रथ ठाकरे गटाच्या मेळाव्यामध्ये आणत असतात. आज शिवाजीपार्क अर्थात शिवतीर्थावर ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडतोय, तर दूसरीकडे आझाद मैदानावर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पाहायला मिळणार आहे. दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी कऱण्यात आली असून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. शिवतीर्थ परिसरात ठाकरे गटाकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आलीय. त्यासोबत मशाल चिन्ह असलेली पुर्ण भगवी पताका संपूर्ण शिवजी पार्क परिसरात लावण्यात आली आहे, शिवसेना भवन ते शिवाजी पार्क परिसरातील भगव्यामय वातावरण तयार झाले आहे. तर या मेळाव्याला दरवर्षी बाळासाहेबांचा रथ आणणारे उद्धव यादव आणि त्यांचे वडील यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.