Udhav Thackeray : ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
Udhav Thackeray On Eknath Shinde : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज नागपूर हिंसाचारावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक झाले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी ते भेदरले होते, अशी टीका केली आहे.
ते काही आक्रमक झाले नव्हते. तो भेदरटपणा होता, अशी खोचक टीका शिवसेना उबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. विधान परिषदेच्या कामकाजात अनिल परब बोलत असताना आज एकनाथ शिंदे हे आक्रमक झालेले बघायला मिळाले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना हा टोला लगावला आहे.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भेदरटपणाला आक्रमकपणा म्हणता येत नाही. ते भेदरले होते. हे अपयशी आणि फसवेगीरी करून आलेलं सरकार आहे. नागपूरमध्ये आरएसएसचं मुख्य कार्यालय आहे. या कार्यालयाला सुरक्षा दिली गेली आहे. अशा परिस्थितीत नागपूरमध्ये एवढा राडा कसा होतो? असा प्रश्न यावेळी ठाकरेंनी उपस्थित केला आहे. पूर्व नियोजित कट होता, बाहेरून माणसं आली होती असं शिंदे म्हणतात म्हणजे हे तुमच्या सरकारचं अपयशच नाही का? असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे.

'औरंगजेब एक राजा, त्याच्यावर मीच का बोलावं?', जलील यांचं जनतेला पत्र

नागपूर राड्यादरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग, अंधाराचा फायदा घेतला अन्

९ महिने, माणसांपासून दूर,असा होता सुनीता विल्यम्सचा ग्रहवापसीचा प्रवास

सुनीता विल्यम्स 'ग्रह'वापसी, बघा अवकाशातून पृथ्वीवर परण्याचा प्रवास
